राहाता तालुक्याची चिंता कायम

42 करोना रुग्णांची भर; 32 रुग्णांना डिस्चार्ज
राहाता तालुक्याची चिंता कायम

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) काल नवीन 42 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले आहेत. काल 32 रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी 224 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) आहेत त्यामुळे राहाता तालुक्याची चिंता तिसर्‍या दिवशीही कायम आहे.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 21659 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 21405 रुग्ण बरे होऊन घरी गेले. नवीन रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 01. खासगी रुग्णालयात 24 तर अँटीजेन चाचणीत 17 रुग्ण आढळून आले आहेत. तर 32 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-03, राजुरी-01, एकरुखे-01, लोणी खुर्द-01, डोर्‍हाळे-06, कोर्‍हाळे-03, कोल्हार-06, बाभळेश्वर बुद्रुक-01, सावळीविहिर बुदक-01, निघोजन-01, वाकडी-01, धनगरवाडी-01, चितळी-01, पुणतांबा-02 असे एकूण 29 रुग्ण आढळून आले आहेत. यात शिर्डी-05, राहाता 05 तर अन्य तालुक्यातील व बाहेरील एक असे 03 रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com