राहाता तालुक्यात केवळ 11 करोना बाधित

राहाता तालुक्यात केवळ 11 करोना बाधित

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) काल केवळ 11 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 06 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 54 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 24531 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले. तर 24288 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-03, खासगी रुग्णालयात 07 तर अँटीजेन चाचणीत (Antigen Testing) 01 असे एकूण 11 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) पिंपरी निर्मळ-01, लोणी खुर्द-01, साकुरी-01, कोल्हार-01, निमगाव-01, पिंपळवाडी-02, वाकडी-01, रास्तापूर-01 असे 09 तर शहरी शिर्डी-01, राहाता-01 व अन्य-01 असे सर्व एकूण 11 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.