राहाता तालुक्यात 39 करोना बाधित

265 अ‍ॅक्टीव्ह; 85 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 39 करोना बाधित

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) काल तालुक्यात नवीन 39 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळूून आले असून 85 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 265 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid 19 Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 24414 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले. तर 24170 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

खासगी प्रयोगशाळेत 37 तर अँटीजेन चाचणीत (Antigen Testing) 02 असे एकूण 39 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-01, एकरुखे-01, लोणी बुद्रुक-10, लोणी खुर्द-01, कनकुरी-01, वाळकी-01, दहेगाव-02, कोल्हार-08, तिसगाववाडी-01, हनुमंतगाव-01, सावळीविहिर बुद्रुक-0, रुई-01, 2, वाकडी-01, पुणतांबा-01 असे 33 तर शहरी शिर्डी-04, राहाता-01 व अन्य-01 असे सर्व एकूण 39 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com