राहाता तालुक्यात करोनाने चिंता वाढविली; 87 बाधित रुग्ण

386 अ‍ॅक्टीव्ह; 47 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात करोनाने चिंता वाढविली; 87 बाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) गेल्या काही दिवसापासून करोना महामारीने (Corona Pandemic) चांगलीच चिंता वाढविली आहे. बाधितांचा आकडा शंभरीच्या जवळ पोहोचत असल्यामुळे पुन्हा कोविड रुग्णालय (Covid Hospital) सुरु करावे लागणार आहे. काल तालुक्यात 87 करोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patient)आढळूून आले असून 47 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर 386 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 24142 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 23756 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-01 खासगी रुग्णालयात 60 तर अँटीजन चाचणीत 26 असे एकूण 87 नवीन रुग्ण आढळून आले आहे. राहाता तालुक्यातील अस्तगाव-03, राजुरी-02, पिंपरीनिर्मळ-03, रांजणगाव-01, दाढ बुदुक-03, हसनापूर-01, लोणी बु.-14, गोगलगाव-01, लोणी खुर्द-16, नांदुर्खी बुदुक-02, कोर्‍हाळे-01, साकुरी-04, खडकेवाके-01, कोल्हार-06, भगवतीपूर-07, बाभळेश्वर बुद्रुक-01, हनुमंतगाव-03, सावळीविहिर बुद्रुक-02, निमगाव-01, वाकडी-05, नांदूर बुदुक-02, नांदूर खुर्द-01 असे 84 तर शहरी शिर्डी-02, राहाता-02 व अन्य-03 असे सर्व एकूण 87 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे तालुक्यात बंद पडलेली कोविड रुग्णालये पुन्हा सुरु करण्याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी बेसावध राहू नये, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.