राहाता तालुक्यात 08 रुग्ण; 155 अ‍ॅक्टीव्ह

17 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 08 रुग्ण; 155 अ‍ॅक्टीव्ह

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 08 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive)आढळूून आले असून 17 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 155 अ‍ॅक्टीव्ह करोना (Active Patient) रुग्ण उपचार घेत आहेत. काल राहाता (Rahata) व शिर्डी शहरात (Shirdi City) एकही करोना रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे ही दोन्ही शहरे काल करोनामुक्त झाले होते.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 23145 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 22990 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-00 खासगी रुग्णालयात 07 तर अँटीजेन चाचणीत 01 असे एकूण 08 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील ममदापूर-02 लोणी खुर्द-01, कोर्‍हाळे-01, साकुरी-01, ज़ळगाव-01, पुणतांबा-01, रांजणखोल-01 असे एकूण 08 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com