राहाता तालुक्यात 24 रुग्ण ; 159 अ‍ॅक्टीव्ह

34 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 24 रुग्ण ; 159 अ‍ॅक्टीव्ह

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 24 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 34 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता 159 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22988 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21850 रुग्ण बरे होवून घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-02 खासगी रुग्णालयात 18 तर अँटीजेन चाचणीत 04 असे एकूण 24 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-02, चंद्रपूर-01, लोणी बुद्रुक-09, लोणी खुर्द-01, कोर्‍हाळे-01, बाभळेश्वर बुद्रुक-02, वाकडी-01, असे ग्रामीण 19 तर शहरी शिर्डी-02, राहाता-05 अन्य 00 असे सर्व एकूण 24 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com