राहाता तालुक्यात 34 रुग्ण

188 अ‍ॅक्टीव्ह; 34 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 34 रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 34 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून तालुक्याची चिंता वाढली आहे. 34 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता 188 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22724 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21567 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-01 खासगी रुग्णालयात 24 तर अँटीजेन चाचणीत 09 असे एकूण 34 नवीन रुग्ण आढळून आले आहे. राहाता तालुक्यातील अस्तगाव-03, राजुरी-02, लोणी बुदुक-06, लोणी खुर्द-05, आडगाव-06, कोल्हार-01, बाभळेश्वर-02, वाकडी-02, चितळी-01, पुणतांबा-01, असे ग्रामीण 29 तर शहरी शिर्डी-01, राहाता-04 असे एकूण 34 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com