राहाता तालुक्यात 42 रुग्ण

181 अ‍ॅक्टीव्ह; 45 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 42 रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 42 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून तालुक्याची चिंता वाढली पाहिजे. 45 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता 181 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid Patient) उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22637 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21477 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-00 खासगी रुग्णालयात 32 तर अँटीजेन चाचणीत (Antigen testing) 10 असे एकूण 42 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) अस्तगाव-04, राजुरी-01, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-01, लोणी बुदुक-06, गोगलगाव-01, लोणी खुर्द-04, साकुरी-01, दहेगाव-01, खकेवाके-01, पिंपरी लौकाई-01, कोल्हार-01, पिंपळवाडी-01, वाकडी-03, चितळी-01, पुणतांबा-02, रामपूरवाडी-03, असे ग्रामीण 33 तर शहरी शिर्डी-06, राहाता-02, बाहेरील अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 01 असे सर्व एकूण 42 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 42 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता 181 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com