राहाता तालुक्यात 52 रुग्ण; 184 अ‍ॅक्टीव्ह

21 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 52 रुग्ण; 184 अ‍ॅक्टीव्ह

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 52 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून तालुक्याची चिंता वाढली पाहिजे. 21 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे आता 184 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22595 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 21425 रुग्ण बरे होवून घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-00 खासगी रुग्णालयात 45 तर अँटीजन चाचणीत 07 असे एकूण 52 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

तालुक्यातील अस्तगाव-03, पिंपरी निर्मळ-02, रांजणगाव-01, दाढ बुद्रुक-02, हसनापूर-01, लोणी बुदुक-04, लोणी खुर्द-03, नांदुर्खी बुद्रुक-04, साकुरी-01, कोल्हार-01, पाथरे-04, हनुमंतगाव-01, वाकडी-01, धनगरवाडी-01, पुणतांबा-01 असे ग्रामीण 30 तर शहरी शिर्डी-19, राहाता-02, बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 01 असे सर्व एकूण 52 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 21 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे आता 184 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com