राहाता तालुक्यात नवीन 8 करोनाबाधित

राहाता तालुक्यात नवीन 8 करोनाबाधित

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता(Rahata) तालुक्यात 08 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) दिसून येत आहेत. काल 03 रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 195 झाली आहे. तालुक्यात काल मात्र करोना बाधित रुग्णसंख्या घसरली आहे.

राहाता (Rahata) तालुक्यात आतापर्यंत 21367 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21206 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 06 तर अँटीजेन चाचणीत 02 रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) ममदापूर-01, पिंपळस-01, पिंपळवाडी-01, वाकडी-01, असे एकूण 04 व शिर्डी-00, राहाता-04, अन्य तालुक्यातील-00, असे एकूण 08 रुग्ण आढळून आले आहेत.

काल 08 करोना बाधित रुग्ण आढळून आले असून गेल्या दोन दिवसापासून रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. यात 03 बरे होऊन घरी गेले तर 195 रुग्ण सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com