राहाता तालुक्यात केवळ 6 करोना बाधित

राहाता तालुक्यात केवळ 6 करोना बाधित

318 अ‍ॅक्टीव्ह; 22 जणांना डिस्चार्ज

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) काल तालुक्यात काल केवळ 6 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive) आढळूून आले असून 22 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 318 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 24270 करोनाबाधित रुग्ण (Covid Positive Patient) आढळून आले.

तर 23973 रुग्ण बरे होऊन घरी गेले. खासगी प्रयोगशाळेत 06 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) ममदापूर-01, गोगलगाव-01, दहेगाव-01, कोल्हार-01, सावळीविहिर बुद्रुक-01, असे 05 तर अन्य-01 असे सर्व एकूण 06 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.