राहाता तालुक्यात एकच सक्रीय रूग्ण

59 गावे करोनामुक्त, तर 19 गावांचे 100% लसीकरण
राहाता तालुक्यात एकच सक्रीय रूग्ण

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील साठ गावांपैकी 59 गावांमध्ये करोनाचे सक्रीय रूग्ण संख्या शुन्यावर आली असल्याने तालुकावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ शिर्डी मध्ये एकच सक्रीय रूग्न संख्या असल्याने तालुका जवळपास करोनामुक्त झाला आहे.

करोनाची लाट ओसरत असल्याने राहाता तालुक्याची करोना मुक्तिकडे वाटचाल झाली आहे.आरोग्य विभाग, महसुल प्रशासन, पंचायत समिती व गांवामधील स्थानिक प्रशासन यांच्या सामुहीक प्रयत्नामुळे राहाता तालुक्यातील 59 गांवामध्ये दि. 16 एप्रिलच्या अहवालानुसार एकही रूग्न नाही तर उर्वरीत एका गांवामध्ये केवळ एक सक्रीय रूग्न आहे. तालुक्यातील सर्वच गावात करोनाचा प्रार्द्रुभाव ओसरत असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या राहाता,कोल्हार,लोणी खुर्द या गावामध्येही रूग्णसंख्या शुन्य असल्याचे चित्र आहे. 16 एप्रिलच्या अहवालानुसार तालुक्यातील एकुण सक्रीय रूग्न संख्या केवळ एक आहे. यामध्ये शिर्डीचा समावेश आहे.करोनाचे सर्व निर्बध घटले असुन दैनदीन सापडणार्‍या रूग्णामध्ये लक्षणीय घट आल्याने जनजिवन पुर्वपदावर आले आहे.प्राथमीक, माध्यमीक शाळाही सुरू झाल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com