करोना बाधितांमध्ये राहाता जिल्ह्यात टॉप वन

64 बाधित रुग्ण, 255 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण तर 63 डिस्चार्ज
करोना बाधितांमध्ये राहाता जिल्ह्यात टॉप वन

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

करोना बाधितांच्या (Covid 19) रांगेत राहाता तालुका (Rahata Taluka) जिल्ह्यात टॉप वन वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. काल राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 64 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 63 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 255 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 24595 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 24351 रुग्ण बरे होऊन घरी गेले. खासगी प्रयोगशाळेत 53 तर अँटीजेन चाचणीत (Antigen Test) 11 असे एकूण 64 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) अस्तगाव-03, ममदापूर-02, पिंपरी निर्मळ-02, एकरुखे-01, दाढ बुद्रुक-02, हसनापूर-01, चंद्रापूर-01, लोणी बुद्रुक-10, लोणी खुर्द-08, कनकुरी-02, कोर्‍हाळे-01, साकुरी-05, पिंपळस-03, कोल्हार-03, भगवतीपूर-01, हनुमंतगाव-01, लोहगाव-02, वाकडी-02, पुणतांबा-01, नांदूर बुद्रुक-01, नपवाडी-01, असे 53 तर शहरी शिर्डी-05 राहाता-05 व अन्य-01 असे सर्व एकूण 64 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.