राहाता तालुक्यात 12 करोनाबाधीत रुग्ण

राहाता तालुक्यात 12 करोनाबाधीत रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) नव्याने 12 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळूून आले असून 11 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर 81 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 25146 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले. तर 25066 रुग्ण बरे होवून घरी गेले.

काल खासगी रुग्णालयात 09 तर अँटीजन चाचणीत 03 असे एकूण 12 नवीन रुग्ण आढळून आले आहे. राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) निर्मळ पिंपरी-02, लोणी बुदुक-02, नांदुर्खी बुदु्रक-01, केलवड बुदुक-01, साकुरी-01, पुणतांबा-03 असे 10 तर शिर्डी शहर-02 असे एकूण 12 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com