राहाता तालुकावासियांना दिवाळीत दिलासा

37 गावात करोनाचे सक्रीय रुग्णच नाहीत
राहाता तालुकावासियांना दिवाळीत दिलासा

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) साठ गावांपैकी 37 गावांमध्ये करोनाचे सक्रीय रुग्ण (Covid 19 Patient) संख्या शुन्यावर आली असल्याने तालुका वासियांना दिवाळीत (Dipawali) मोठा दिलासा मिळाला आहे. 19 गांवामध्ये केवळ शुन्य ते पाच सक्रीय रुग्ण (Patient) आहेत. तसेच सपुंर्ण तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही शंभराच्या आत आली आहे.

माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील (Former Minister MLA Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुका करोना मुक्तिकडे वाटचाल करीत आहेत. आरोग्य विभाग (Department of Health), महसुल प्रशासन (Revenue Administration), पंचायत समिती (Panchayat Samiti) व गांवामधील स्थानिक प्रशासन (Local Administration) यांच्या सामुहिक प्रयत्नामुळे राहाता तालुक्यातील 37 गांवामध्ये दि.3 नोव्हेंबरच्या अहवालानुसार एकही सक्रीय रुग्ण (Patient) नाही तर 19 गांवामध्ये केवळ शुन्य ते पाच सक्रीय रुग्ण आहेत. सहा ते दहा सक्रीय रुग्ण असलेल्या गावांची संख्या दोन आहे तर वीसपर्यत सक्रीय रुग्ण असलेली अवघी दोन गावे आहेत 21 पेक्षा जास्त सक्रीय रुग्णसंख्या एकाही गावांमध्ये नसल्याने तालुक्यातील बहुंताश गावात करोनाचा प्रार्द्रुभाव ओसरत असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या राहाता, शिर्डी, लोणी खुर्द, लोणी बुद्रुक या गावा मध्येही रूग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. दि. 3 नोव्हेंबरच्या अहवालानुसार तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या शंभरच्या आत आली असुन तालुक्यात 96 सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये लोणी खुर्द 18, चोळकेवाडी 15,लोणी बुद्रूक 10 तर राहाता शहरात अवघे 05 व शिर्डी मध्ये केवळ चार सक्रीय रुग्ण आहेत. तालुक्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे एलमवाडी, तरकसवाडी व चोळकेवाडी या गांवामध्ये शंभर टक्के लसीकरण झाले आहे. दिवाळीत गर्दी वाढते मात्र लसीकरण, प्रशासकीय प्रयत्न, नागरिकांची सजगता यामुळे रुग्णसंख्या नियत्रंणात येत असल्याचे दिलासादायक चित्र असुन येत्या भाऊबीजेच्या काळात रुग्णसंख्या वाढु नये यासाठी नागररिकांनी करोनाचे नियम पाळण्याची आवश्यकता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com