राहाता तालुक्यात 10 दिवसात सक्रीय रुग्णसंख्या 10 वरून 120 वर

राहाता तालुक्यात 10 दिवसात सक्रीय रुग्णसंख्या 10 वरून 120 वर

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडुन नवीन निर्बंध लागू केले जात असताना राहाता तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या दहा दिवसापूर्वी 10 सक्रीय रुग्ण असलेल्या तालुक्यात रुग्णांमध्ये वाढ होवून 120 झाली आहे.

तालुक्यात 31 डिसेंबर 2022 ला साठ गावांपैकी 53 गावांमध्ये करोनाची सक्रीय रुग्णसंख्या शुन्यावर आली होती. तर उर्वरित सात गावांमध्येही केवळ दहा सक्रीय रुग्ण होते. मात्र नवीन वर्षात गेल्या आठ-दहा दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे सक्रीय रूग्न शुन्य असलेल्या गावांची संख्या 53 वरून 45 झाली आहे. तर पंधरा गावामध्ये सक्रीय रुग्ण आहेत. 31 डिसेंबरला तालुक्यात अवघे दहा सक्रीय रुग्ण होते.

गेल्या दहा दिवसात यात वाढ होवून ही सक्रीय रुग्णसंख्या 120 च्या घरात गेली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येमध्ये शिर्डी 45, लोणी बुद्रूक 27, राहाता 13, लोणी खुर्द 8, बाभळेश्वर बुद्रूक 5 या गावांचा प्रामुख्याने समावेश आहे. तरीही तालुक्यातील 45 गावात अद्याप करोनाचा एकही सक्रीय रुग्ण नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. 15 ते 18 वयोगटातील तरूणांचे प्रतिबंधात्मक लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ओमायक्रॉन व वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी करोनाचे नियम पाळण्याचे व प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com