राहाता तालुक्यात 22 करोनाबाधितांची भर

41 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 22 करोनाबाधितांची भर

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) नव्यने 22 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले आहे. काल 41 रुग्ण बरे होवून गेले असले तरी अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 101 झाली आहे.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22311 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21210 रुग्ण बरे होवून घरी गेले. खासगी रुग्णालयात 17 तर अँटीजन चाचणीत (Antigen Testing) 05 असे एकूण 22 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) लोणी बुदुक-03, कोर्‍हाळे-02, साकुरी-01, आडगाव बुद्रुक-01, हनुमंतगाव-05, रुई-01, पिंपळवाडी-02, असे ग्रामीण 15 तर शहरी शिर्डी-02, राहाता-04, बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 01 असे सर्व एकूण 22 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com