राहाता तालुक्यात 100 करोनाबाधित

951 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 317 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 100 करोनाबाधित

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 100 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या 317 वर जावून पोहोचली आहे. तर 951 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 18283 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 17009 रुग्ण बरे होवून घरी गेले. ,आज 951 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 05 खासगी रुग्णालयात 40 तर अँटीजन चाचणीत 55 रुग्ण आढळून आले आहेत. तर 317 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

तालुक्यात राजुरी-01, पिंपरी निर्मळ-02, दुर्गापूर-02, लोणी बुद्रुक-13, गोगलगाव-05, लोणी खुर्द-10, डोर्‍हाळे-01, नांदुर्खी बुद्रुक-01, कोर्‍हाळे-04, केलवड बुदुक-12, साकुरी-01, दहेगाव-01, कोल्हार-05, बाभळेश्वर बुद्रुक - 02 वाकडी-07, जळगाव-02, चितळी-01, पुणतांबा-04, रांजणखोल-02, नांदूर बुद्रुक-08, रामपूरवाडी-01, असे ग्रामीण 86 रुग्ण, शिर्डी-04, राहाता-07, बाहेरील तालुक्यातील 3 असे एकूण 100 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी होवून तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. काल 100 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण दुपटीने आहे. सध्या तालुक्यात 951 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com