राहाता तालुक्यात 107 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

45 बाधित; 51 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 107 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 45 करोनाबाधित रुग्ण (covid 19 Positive) आढळूून आले असून तालुक्याची चिंता वाढली आहे. काल 51 रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 107 झाली असून अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22356 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21261 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात (District Patient) -01, खासगी रुग्णालयात 23 तर अँटीजेन चाचणीत (Antigen Testing) 21 असे एकूण 45 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) अस्तगाव-02, एकरुखे-01, हसनापूर-02, लोणी बुद्रुक-09, लोणी खुर्द-02, डोर्‍हाळे-02, कोर्‍हाळे-01, केलवड बुद्रुक-02, कोल्हार-03, भगवतीपूर-02, पाथरे 11, लोहगाव-01, सावळीविहिर बुद्रुक-01, असे ग्रामीण 39 तर शहरी शिर्डी -01, राहाता-04, बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांची नाव, फोन नंबर नाहीत असे 01 असे सर्व एकूण 45 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. 107 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com