राहाता तहसीलवर धरणे आंदोलन

राहाता तहसीलवर धरणे आंदोलन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राहाता तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कुंदन हिरे यांना देण्यात आले. यावेळी समाजाच्यावतीने कमलाकर कोते व सचिन चौगुले यांच्यासमवेत एक तास धरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्यावतीने 10 मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षण अंमलबजावणीला न्यायालयाने स्थगिती दिली.

ती त्वरित मागे घ्यावी, एसईबीसी प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये 12 टक्के जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी वाढवाव्यात, मराठा आरक्षण स्थगिती असेपर्यंत पोलीस भरती व इतर कोणतीही नोकरभरती करण्यात येऊ नये, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठल्याशिवाय एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नयेत.

मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संसदेत स्वतंत्र कायदा करावा. मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमध्ये नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्यावे. सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास भरीव निधी द्यावा. मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र अद्ययावत वसतिगृह तात्काळ सुरू करावे आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणा देत तहसील परिसर दणाणून सोडला होता. राकेश भोकरे, मदन मोकाटे, प्रसाद काळे, आदित्य सदाफळ, कृष्णा इथापे, आकाश गाडे, प्रविण सदाफळ, रामनाथ सदाफळ, नितीन सदाफळ, संदीप घाडगे, संजय सातव, सुनील बारहाते, राहुल गोंदकर, संजय धनवटे, अ‍ॅड. भाऊसाहेब सदाफळ, वैभव कोते, बाबासाहेब भवर, संजय भवर, नवनाथ आसने, प्रतिक डोळस, चंद्रकांत गायकवाड आदी तरुण यावेळी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com