राहात्यातील नुकसानग्रस्त गाळेधारकांच्या मालाची प्रांताधिकार्‍यांकडून पाहणी

राहात्यातील नुकसानग्रस्त गाळेधारकांच्या मालाची प्रांताधिकार्‍यांकडून पाहणी

राहाता |वार्ताहर| Rahata

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गाळेधारकांच्या दुकानातील मालाची पाहणी प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांनी करून नुकसान झालेल्या नागरिकांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

गेल्या आठवड्यात दोन वेळेस राहाता नगरपालिकेच्या छत्रपती कॉम्प्लेक्समधील तळमजल्यातील गाळ्यामध्ये पाणी घुसल्याने गाळेधारकांचे लाखोचे नुकसान झाले. गाळेधारकांनी नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करीत नगर-मनमाड महामार्ग रास्तारोको केला. नुकसान झालेल्या गाळेधारकांना दिलासा देण्याकरिता ना. विखे पाटील यांनी तात्काळ पावसाचे पाणी उपसा करण्याकरिता मडपंप देऊन व्यावसायिकांना मोठा आधार देण्याचे काम केले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून गुरुवारी सकाळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील नुकसान झालेल्या दुकानांची पाहणी करुन यावर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या सूचना राहाता नगरपरिषदेला दिल्या.

यावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, तलाठी कृष्णा शिरोळे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, कैलास सदाफळ, राजेंद्र वाबळे, साहेबराव निधाने, डॉ.स्वाधीन गाडेकर, राहुल सदाफळ, वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, गणेश बोरकर, सलीम शहा, संजय सदाफळ, भीमराज निकाळे, स्वप्नील गाडेकर, विजय मोगले, विजय बोरकर, दशरथ तुपे आदींसह गाळेधारक यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com