राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

खा. सदाशीव लोखंडे याच्या उपस्थितीत राहाता तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक सोमवारी शिर्डीत हॉटेल शांतिकमल येथे पार पडली.

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती शिवसेना पूर्ण ताकदीनीशी लढविण्याचा निर्णय झाला.

यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख संजय शिंदे, कमलाकर कोते, महिला आघाडी जिल्हा प्रमुख अनिताताई जगताप, शिवाजी चौधरी, विठ्ठल पवार, सचिन कोते आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खा. लोखंडे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे सर्व ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. स्थानिक पातळीवर खासदार निधीमधून विकास कामाला निधी दिला जाईल. शिवसैनिकांनी तळागाळापर्यंत काम केल्यामुळे शिवसैनिकांना चांगली संधी असून काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू, असे सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसैनिकांना पक्षाकडून ताकद दिली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांना कर्जमुक्ती, पीक विमा, अतिवृष्टीसाठी मदत केल्यामुळे जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शिवसैनिकांना निवडणूक सोपी आहे.

कमलाकर कोते म्हणाले, शिवसैनिकांच्या स्थानिक पातळीवरील अडचणी सोडविण्यात येतील. शिवसैनिक हा त्या गावातील सरकारचा सर्वात मोठा दुवा आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास फक्त शिवसैनिकच करू शकतात. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू, असे स्पष्ट केले.

यावेळी सुभाष उपाध्ये, अनिल बांगरे यांनी मनोगत व्यक्त केले. मुंगसे, शिवाजी चौधरी, सचिन कोते, गणेश सोमवंशी, भास्कर मोटकर, पुंडलिक बावके, भानुदास कातोरे, सावळेराम डांगे, जालिंदर घोरपडे, संजय आहेर, राजेश कापसे, किरण जपे, हरीराम राहणे, दत्ता आसने, जयराम कांदळकर, अक्षय तळेकर, विश्वजित बागुल, मंजीराम शेळके, प्रसाद पाटील, डॉ. शरद भदे, रिंकेश जाधव, दिलीप घोडेकर, कस्तुरीताई मोदलीयर, लक्ष्मीताई आसने यावेळी उपस्थित होते.