शिवसेना आ.संजय गायकवाडांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध

आंबेडकरी समाजाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
शिवसेना आ.संजय गायकवाडांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध

राहाता | Rahata

मागासवर्गीय समाजाच्या (Backward society) भावना दुखाविणारे बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड (Shivsena MLA Sanjay Gaikwad) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची आमदारकी रद्द करावी या मागणीसाठी राहाता (Rahata) तालुक्यातील आंबेडकरी समाजाच्या (Ambedkarite society) वतीने राहाता पोलीस ठाण्यावर (Rahata Police Station) मोर्चा काढत निवेदन देण्यात आले. राहाता चौक ते पोलीस ठाणे (Rahata Chowk to Police Thane) असा हा मोर्चा काढण्यात आला होता.

शिवसेना आ.संजय गायकवाडांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध
नगरमध्ये आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी दोन कुटुंबीयांच्या वादामध्ये चुकीची भुमिका बजावून अ‍ॅट्रॉसिटी (Atrocities Act) दाखल करणाऱ्यांना झोडून काढण्याची भाषा वापरली आहे. आंबेडकरी समाज आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करुन मागासवर्गीय समाजातील नागरीकांना षडयंत्राद्वारे त्रास देण्याचे काम चालविले आहे. नेहमीच वादग्रस्त विधाने करुन मागासवर्गीय समाजाच्या विरोधात भुमिका घेवून आंबेडकरी समाज बांधवांच्या भावनांना ठेच पोहोचविणाऱ्या तसेच समाजा समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचा आम्ही जाहीर निषेध करीत असुन आमदार असलेल्या या माणसामुळे राज्यात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चिथावणीखोर वक्तव्य, जातीय तेढ निर्माण करण्याची भाषा आणि नेहमीच वादग्रस्त विधाने करुन आंबेडकरी समाजाचा अपमान करणाऱ्या या आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करत असल्याचे निवेदन पोलीस निरीक्षक सुभाष भोये (Police Inspector Subhash Bhoye) यांना देण्यात आले. आमदार गायकवाड यांच्यावर त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

शिवसेना आ.संजय गायकवाडांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध
हभप बंडातात्या कराडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोलेत आंदोलन

यावेळी रिपब्लिकन पँथर पार्टीचे बाळासाहेब गायकवाड (Republican Panther Party Balasaheb Gaikwad), पप्पू बनसोडे (Pappu Bansode), रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड (RPI Dipak Gaikwad ), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिमोन जगताप (Simon Jagtap), साकुरीचे उपसरपंच सचिन बनसोडे (Sachin Bansode), निमगावचे उपसरपंच अजय जगताप (Ajay Jagtap), भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड (Anil Gaikwad), राहाता नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सुनिता टाक (Sunita Tak), शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अलका शेजवळ (Alka Shejwal), तुषार सदाफळ (Tushar Sadafal), दिपक शिंदे (Dipak Shinde), राजेंद्र पाळंदे (Rajendra Palande), वसंत खरात (Vasant Kharat), गणेश निकाळे (Ganesh Nikale), अनिल त्रिभुवन (Anil Tribhuvan), दिलीप वाघमारे (Dilip Waghmare) आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com