रांजणगावच्या तरुणाची श्रीरामपुरात रेल्वेखाली आत्महत्या

रांजणगावच्या तरुणाची श्रीरामपुरात रेल्वेखाली आत्महत्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राहाता (Rahata) तालुक्यातील रांजणगावच्या (Rajangav) तरुणाने काल श्रीरामपूर (Shrirampur) येथील सुतगिरणीपासून काही अंतरावर रेल्वेखाली आत्महत्या (Suicide) केली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र कळू शकले नाही. काही अंतरावरच त्याची मोटारसायकल आढळून आली. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहाता (Rahata) तालुक्यातील रांजणगावचे भाऊसाहेब काशिनाथ पडवळ (वय 45) हे काल त्यांच्या स्प्लेंडर एमएच 17 एच 6855 हे त्यांच्या मोटारसायकलवरुन श्रीरामपूरच्या सुतगिरणीजवळ आला होता. त्याने त्याची मोटारसायकल जवळच लावलेली होती. त्याने काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक शेलार व पोलीस नाईक कारखेले यांनी तात्काळ तपास करुन मयताची ओळख भाऊसाहेब पडवळ अशी पटवुन दिली. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com