सोयाबीन चोरांचा सुळसुळाट

सोयाबीन
सोयाबीन

पिंपरी निर्मळ | वार्ताहर

राहाता तालुक्यातील पिपंरी निर्मळ परीसरात सोयाबीन चोरटयांनी उच्छाद मांडला आहे. दोन शेतक-यांच्या खळ्यावर वाळण्यास घातलेली सोयाबीन चोरटयांनी चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने सोंगणीस आलेल्या सोयाबीनचे प्रंचड नुकसान झाल्याने पिंपरी निर्मळ परीसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यातच शेतातुन काढुन आणलेली सोयाबीन शेतकऱ्यांनी वाळविण्यासाठी खळयावर वाळण्यास घातली असतांना येथील दादासाहेब घोरपडे यांची जवळ पास तिन क्वींटल व सुनिल निर्मळ यांची दोन क्वीटंल सोयाबीन चोरटयांनी चोरली आहे.

रात्रीच्या वेळी घराजवळुन चोरटयांनी सोयाबीन वर डल्ला मारल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. लोणी पोलिसांनी या चोरटयांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com