राहाता पंचायत समितीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी स्विकारला पुरस्कार || राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान
राहाता पंचायत समितीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेत (Rajiv Gandhi Administrative Mobility Campaign Competition) राहाता पंचायत समितीला (Rahata Panchayat Samiti) 2021-22 या वर्षाचा तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कारांचे (State level Awards) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी समर्थ शंकरराव शेवाळे (Group Development Officer Samarth Shewale) यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

आजच्या नागरी सेवा दिनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात राहाता पंचायत समितीला (Rahata Panchayat Samiti) हा पुरस्कार देण्यात आला. पंचायत समितीच्यावतीने गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे (Group Development Officer Samarth Shewale) यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राहाता पंचायत समितीचे उपअभियंता देविदास धापटकर, विस्तार अधिकारी शंकरराव गायकवाड, कक्ष अधिकारी रवींद्र सोज्वळ, किरण पागिरे, संतोष कोळगे, मकरंद गायकवाड, शरद टिक्कल, जालिंदर शिंदे, रवींद्र नालकर उपस्थित होते.

खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil), आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil), जिल्हा परिषद सदस्या शालिनी विखे पाटील (Shalini Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या स्थानिक पातळीवरील समस्यांचे थेट केलेले निराकरण, करोना कालावधीतील केलेली मदत, बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व प्रदर्शन कार्यक्रम, घरकुल प्रकल्प कार्यक्रम यशस्वीपणे राबविणे, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे केलेली अंमलबजावणी यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे समर्थ शेवाळे यांनी सांगितले.

राहाता पंचायत समितीला राज्य पातळीवरील मिळालेला पुरस्कार हा सांघीक प्रयत्नांचे यश असल्याची प्रतिक्रीया जिल्हा परिषद सदस्या शालिनी विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. पंचायत समितीच्या माध्यमातुन सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामुहिकपणे निर्णयांची केलेली अंमलबजावणी, उपलब्ध झालेल्या निधीचा योग्य विनीयोग आणि प्रशासकीय कामात दाखविलेली तत्परता यामुळेच हे मोठे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

राहाता पंचायत समितीला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पंचायत समितीच्या सर्व पदाधिकारी आणि अधिकारी, कर्मचारी यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Stories

No stories found.