राहाता बाजार समितीत 12082 गोणी कांद्याची आवक

राहाता बाजार समितीत 12082 गोणी कांद्याची आवक
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल शुक्रवारी राहाता बाजार समितीत 12082 गोणी कांदा आवक झाली तर डाळिंबाच्या 14550 क्रेट्सची आवक झाली. एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 1900 ते 2500 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1250 ते 1850 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1200 असा भाव प्रतिक्विंटलला मिळाला.

तर गोल्टी कांदा 1500 ते 1700 व जोड कांदा 100 ते 600 असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. डाळिंबाच्या 14550 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 101 ते 135 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 71 ते 100 रुपये इतका भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 36 ते 70 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. तर डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com