राहाता बाजार समितीत 13123 कांदा गोणी आवक

राहाता बाजार समितीत 13123 कांदा गोणी आवक
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल बुधवारी राहाता बाजार समितीत 13123 गोणी कांद्याची आवक झाली तर डाळिंबाच्या 11308 क्रेटसची आवक झाली. कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1900 ते 2500 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1250 ते 1850 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1200 रुपये इतका भाव मिळाला.

गोल्टी कांदा 1500 ते 1700 व जोड कांदा 400 ते 600 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची 11308 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 101 ते 140 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 100 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com