राहाता नगरपालिकेचा पहाटे 5 वाजेचा भोंगा देखील बंद

राहाता नगरपालिकेचा पहाटे 5 वाजेचा भोंगा देखील बंद

राहाता |प्रतिनिधी| Rahata

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या मशिदीवरील भोंग्याच्या अल्टीमेटमनचा फटका धार्मिक तिर्थस्थळांनाही बसला असून शहरातील नगरपालिकेचा पहाटे 5 वाजेचा भोंगा देखील बंद झाला आहे तर पहाटेची अजान देखील लाऊडस्पिकरविना पार पडली आहे. राहाता शहरात पहाटे 5 तर दुपारी 12 वाजता नगरपालिकेचा भोंगा होतो.

मात्र राज ठाकरेंच्या भुमिकेमुळे काल बुधवार पहाटेचा भोंगा काही वेळ सुरू होताच बंद करण्यात आला तसेच आज गुरूवार पासून पहाटेच्या भोंग्याचा आवाज नागरिकांना ऐकू येणार नाही. तशा सुचना पोलिस प्रशासनाने नगरपालिकेल्या दिल्या आहेत. सायंकाळी 7 वाजेच्या अजानचा आवाज देखील कमी जास्त ऐकू आला. सुरूवातीला मोठा आवाज असताना नंतर हा आवाज कमी होत गेला.

Related Stories

No stories found.