राहाता नगरपरिषद निवडणूक संदर्भात आ. काळे यांची बैठक

राहाता नगरपरिषद निवडणूक संदर्भात आ. काळे यांची बैठक

राहाता |वार्ताहर| Rahata

राहाता शहराच्या आगामी येणार्‍या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी पदाधिकार्‍यांना महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन केले.

सर्व पदाधिकार्‍यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ यांनी राहाता नगरपालिकेच्या सर्व प्रभागांत उमेदवार देण्यास राष्ट्रवादी सक्षम आहे, असे मनोगत व्यक्त केले. सर्व पदाधिकार्‍यांच्या सूचना ऐकल्यानंतर आ. आशुतोष यांनी देखील सदर बैठकीत सर्व प्रभागात राष्ट्रवादी उमेदवार देणार असल्याबाबत कार्यकर्त्यांना निर्देश देण्यात आले.

याप्रसंगी गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, गणेशचे माजी संचालक भगवानराव टिळेकर, निळवंडे कृती समितीचे ज्ञानेश्वर वर्पे, ज्ञानेश्वर गाडेकर, युवक जिल्हा सरचिटणीस, रणजीत बोठे, जाईदभाई दारूवाला, हेमंत अनाप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com