छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना

मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवकांवर गुन्हा दाखल करा : छावा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना

राहाता (वार्ताहर) - छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचा अवमान केल्या प्रकरणी मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवकांवर गुन्हा दाख करावा, या मागणीसाठी राहता नगरपरिषदेसमोर अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनेक दिवसांपासून राहाता येथे गोडाऊनमध्ये आणून ठेवलेला आहे. त्या संदर्भात अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली दि. 5 जुलै 2021 रोजी नगरपरिषद राहाता कार्यालयात घेराव आंदोलन करत निवेदन दिले होते. परंतु संबंधित विषयी आजपर्यंत पालिकेने ताब्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या करणाने बंदिस्त ठेवला आहे? कोणत्या ठिकाणी बसविण्यासाठी आणण्यात आला असून त्या ठिकाणी कोणते आरक्षण प्रस्तावित आहे?

त्या संदर्भात पालिकेने कोणत्या विभागाची परवानगी घेतली आहे? तसेच आजपर्यंत कोणकोणते ठराव या पुतळ्या विषयी करण्यात आले ही सर्व माहिती लेखी स्वरूपात संघटनेला आठ दिवसात देतो, असे मुख्याधिकार्‍यांनी अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांना संगितले होते. दिलेल्या आश्‍वासनास 10 दिवस होऊन देखिल काहीही लेखी न देता केवळ वेळकाढूपणा करून विषय टाळण्याचा प्रयत्न चालवला असून शुक्रवार दि. 16 रोजी पुन्हा अ. भा. छावा संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी दिलेल्या लेखी पत्राप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पांढर्‍या कापडाने झाकलेला नाही किंवा कडेने सुरक्षित भिंत नाही हे त्यामुळे त्यांनीच दिलेल्या लेखी पत्रानुसार नगरपरिषद राहाता मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांच्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अवहेलना करून कर्तव्यात कसूर करत शिवाजी महाराजांचा पुतळा अनेक वर्षे गोडाऊनमध्ये ठेवण, तो व्यवस्थित झाकून न ठेवणे, त्याची स्वच्छता न ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा इशारा अ. भा. छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख नितीन पटारे यांनी दिला आहे.

यावेळी सुहास निर्मळ, अतुल चौधरी, शरद बोंबले, ताराचंद राऊत, मनोज होंड, महेश लहारे, प्रथमेश राऊत, सुरेश ठोके, सुभाष कापसे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com