ना. आठवले आणि आ. विखे पाटलांमध्ये रंगली कवितेची स्पर्धा

कार्यकर्त्यांनीही दिली दाद!
ना. आठवले आणि आ. विखे पाटलांमध्ये रंगली कवितेची स्पर्धा

राहाता (प्रतिनिधी)

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व राज्याचे माजी मंत्री भाजपचे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील कविता सादरीकरण चर्चेचा विषय ठरला. आरपीपी पक्षाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षात विलीनीकरण झाले यादरम्यानच्या सोहळ्यात मंत्री ना. आठवले व आ. विखे पाटील यांच्यामध्ये ही जुगलबंदी रंगली.

आ. राधाकृष्ण विखे पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाषणातून ना. आठवले यांचेवर कविता सादर केली. आपल्या राजकीय कारकीर्दीत विरोधकांना नमविणारे करोना महामारीत लोकांना हसवून चिंतामुक्त करणारे ज्यांनी स्वतः करोनालाही हरवले अशा ना. आठवले यांच्या कार्यक्रमात माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कवितेचा मोह आवरला नाही, अखेर त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट ना. आठवले यांच्यावर कविता करून केला. शीघ्र कवी असलेल्या नामदार आठवले यांना मग कवितेची आठवण होणार नाही असं कधी होईल का ? त्यांनीही आपल्या खास शैलीतून उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्वर्गीय पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे आवर्जून स्मरण आपल्या अनोख्या कवितेच्या शैलीतून केले आणि उपस्थित शिर्डी मतदार संघातील कार्यकर्त्यांसह व्यासपीठावरील मान्यवरांची मने जिंकून घेतली.

पाण्याचं आणि विखे पाटलांचं किती अतूट नात आहे हे त्यांचे स्मरण कवितेतून करताना भंडारदरा धरण आणि त्या माध्यमातून मी करतो विखे पाटलांना नमन यांची सांगड घालून विखे पाटलांचं या जिल्ह्यातील विकास कामात असलेले योगदान अधोरेखित केल, तर विखे पाटलांनी भाषणात निसर्गराजानेही पावसांच्या लहरीचा वर्षाव करून गारवा देत आठवले यांचा स्वागत केल्याच आवर्जून सांगितले. तर आठवले यांनी सुद्धा निसर्गाने केलेल्या स्वागताचा संदर्भ देत उपस्थितांची लक्षणीय गर्दी बघता, ढगांचा होणारा कडकडाट अन भाजपा-आरपीआयची आली लाट!! राजकारण म्हटले की विरोधकांना चिमटा घेतला असं होणारच नाही ती संधी नामदार आठवले यांनी सुद्धा सोडली नाही. मी आलो आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना साथ देण्यासाठी... आणि आम्ही दोघे मिळून मुंबईला जात आहोत महाविकास आघाडीचा बदला घेण्यासाठी. अशाप्रकारे कवितेचे सादरीकरण करून या मेळाव्यात त्यांनी आगामी नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकींना यशस्वीरित्या सामोरे जाण्याचा संदेशही कार्यकर्त्यांना दिला आहे. अपेक्षेप्रमाणे उपस्थित असलेले श्रोत्यांमध्ये ना. रामदास आठवले यांच्या कवितेमुळे हास्याचे फुलारे फुलत गेले. एकंदरीत ही कवितेची जुगलबंदी कार्यक्रमाच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू व चर्चेचा विषय ठरला हे नक्की!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com