राहात्यातून युवती बेपत्ता

राहात्यातून युवती बेपत्ता

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता येथील 19 वर्षीय युवती राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. कु. ॠतुजा गंगाधर भुजबळ (रा. 15 चारी) असे बेपत्ता युवतीचे नाव आहे. ॠतुजा ही 25 एप्रिल रोजी सकाळी 5 ते 5.30 च्या दरम्यान राहत्या घरातून कुणास काहीही न सांगता निघून गेली आहे. त्यांच्या घराच्या आजूबाजूला राहाता, पिंपळस गावात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. अशी खबर तीचे वडील गंगाधर तयाराम भुजबळ यांनी राहाता पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यावरुन राहाता पोलिसांनी मिसींग रजि. नंबर 23/2022 दाखल केली आहे. सदरची मुलीची उंची 5 फुट 3 इंच आहे. रंगाने गोरी, डोळे घारे, कपाळ उंच, केस लांब, गुलाबी रंगाचा कुर्ता व काळे रंगाची पँट असे कपडे परिधान केले आहेत. पायात चप्पल असे वर्णन आहे. या मिसींगचा तपास पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉ0. दिलीप तुपे करत आहेत.

Related Stories

No stories found.