राहाता व्यापारी संकुलला अहिल्यादेवी होळकर नाव देण्यासाठी सार्वमतचे मोलाचे योगदान

राहाता व्यापारी संकुलला अहिल्यादेवी होळकर नाव देण्यासाठी सार्वमतचे मोलाचे योगदान

राहाता |वार्ताहर| Rahata

राहाता नगरपरिषद व्यापारी संकुललाा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी सार्वमत वृत्तपत्राचे मोलाचे योगदान असून दैनिक सार्वमतने वेळोवेळी प्रसिद्धी दिल्यामुळेच पालिका प्रशासनाने दखल घेऊन नाव दिले असल्याची प्रतिक्रिया राज्य जनमंच पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गिधाड यांनी व्यक्त केली.

2006 ला नगरपरिषदेत ठराव करूनही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात विलंब होत असल्याचे वृत्त दैनिक सार्वमत वर्तमानपत्रातून गुरुवारी प्रसिद्ध केल्यामुळे नगराध्यक्षा व नगरपालिका प्रशासन यांनी सार्वमत वृत्ताची दखल घेऊन व्यापारी संकुलला राजमाता अहिल्यादेवी होळकर नाव दिल्याबद्दल राहाता येथील जनमंच पक्ष व समाज बांधवांनी रविवारी सकाळी वीरभद्र मंदिरासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून सार्वमत वृत्तपत्राचे अभिनंदन केले.

यावेळी बाळासाहेब गिधाड म्हणाले, नगरसेविका शारदा गिधाड यांनी राहाता नगरपरिषदेमध्ये 2017 ला नगरसेविका पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नगरपरिषदेत पहिल्याच विशेष सर्वसाधारण सभेत राहाता व्यापारी संकुलला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, असा ठराव करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यांनी सातत्याने नगरपरिषदेत होणार्‍या नगरसेवकांच्या बैठकीत व्यापारी संकुलला नाव देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. परंतु अनेक वर्ष होऊनही व्यापारी संकुलाला नाव देण्यासाठी विलंब होत असल्याने समाज बांधवांची प्रतिनिधी म्हणून समाज बांधवांच्या मनातील इच्छा पाच वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण व्हावी याकरिता दैनिक सार्वमतच्या माध्यमातून नाव देण्यासाठी वेळोवेळी प्रसिद्धी दिली.

त्यामुळे राहाता नगरपालिका प्रशासन व नगराध्यक्षा यांनी वृत्तपत्राची दखल घेऊन रविवारी व्यापारी संकुलला राजमाता अहिल्यादेवी होळकर नाव दिले. सोमवारी कार्यकाळ संपल्यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर नाव दिल्याबद्दल नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे अभिनंदन करण्यासाठी जाणार असल्याचे गिधाड यांनी सांगितले.

याप्रसंगी विरभद्र देवस्थानचे पुजारी सर्जेराव भगत, नगरसेविका शारदा गिधाड, नगरसेवक सचिन गाडेकर, दिपक सोळंकी, महेश सदाफळ, रंगनाथ गिधाड, अजिंक्य गिधाड, शिवाजी नजन, ज्ञानेश्वर पाचारणे, ज्ञानेश्वर गिधाड, राज लांडगे, नवनाथ गिधाड, अनिल बेढे, शिवाजी मेचे, संतोष धुमसे, एकनाथ मेचे, कैलास मेहेत्रे, संदीप धुमसे, विशाल गायकवाड, अशोक गायकवाड, बाळासाहेब बनकर, पोपट बनकर, तात्या गिधाड, बापू नजन, भाऊसाहेब नजन यांच्यासह समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com