राहाता बाजार समितीत कांदा व सोयाबिनला मिळाला 'हा' भाव

राहाता बाजार समितीत कांदा व सोयाबिनला मिळाला 'हा' भाव
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) 2000 रुपये भाव मिळाला. तर सोयाबिनला (Soybean) जास्तीत जास्त 6437 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

बाजार समितीत मंगळवारी 22019 गोण्या कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1500 ते 2000 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 950 ते 1450 इतका भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 900 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 900 ते 1100 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा 100 ते 400 रुपये इतका भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) 855 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 121 ते 166 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 81 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

सोयाबिनला (Soybean) कमीत कमी 6311 रुपये, जास्तीत जास्त 6437 रुपये तर सरासरी 6365 रुपये इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. गव्हाला सरासरी 2150 रुपये. मकाला सरासरी 2261 रुपये भाव मिळाला. बाजरी सरासरी 1799 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 4201 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com