राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी यांची निवड

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी यांची निवड

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर यांची तर उपसभापती पदी अण्णासाहेब भाऊसाहेब कडू यांची बिनविरोध झाली आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील ही बाजार समिती राज्यात अग्र्रणी आहे. या बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच होऊन विखे पाटील यांच्याकडे एकहाती सत्ता सभासदांनी दिली आहे. काल गुरुवारी नूतन संचालक मंडळाची पदाधिकारी निवडीसाठी बैठक सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी सभापती व उपसभापती पदासाठी गोंदकर व कडू यांचे दोघांचेच अर्ज आल्याने या दोघांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी संजय पाटील, सचिव उध्दव देवकर, विखे पाटील यांचे स्विय सहायक प्रमोद राहाणे आदींसह संचालक विजय कातोरे, संतोष गोर्डे, दत्तात्रय गोरे, ज्ञानदेव चौधरी, बाबासाहेब शिरसाठ, मिना निर्मळ, रंजना लहारे, दिलीप गाडेकर, राजेंद्र धुमसे, जालिंदर गाढवे, राहुल धावणे, सुभाष गायकवाड, शांताराम जपे, सचिन कानकाटे, निलेश बावके, बाबासाहेब कांदळकर आदी उपस्थित होते.

निवडीनंतर सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व उपसभापती अण्णासाहेब कडू यांचा सत्कार करण्यात आला. सर्व संचालक मंडळाचा सत्कार यावेळी करण्यात आला. ना. विखे पाटील यांचे स्विय सहायक प्रमोद राहाणे यांनी ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडल्याबद्दल संचालक मंडळाचे तसेच निवडणूक यंत्रणेचे ना. विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी गणेशचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक मधुकर कोते, दिगंंबर कोते, साई बाबा ग्रेप ग्रोअर सोसायटीचे अध्यक्ष चंद्रभान बावके, शिवाजी गोंदकर, वाल्मिकराव गोर्डे, किरण दंडवते, ओमेश जपे, कानिफ बावके, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश बावके, नंदकुमार गव्हाणे, नवनाथ नळे, ज्ञानदेव गोर्डे, राजेंद्र पठारे, सागर गोर्डे, राजेंद्र तांबे, विजय गोंदकर, विलास रोहोम, बापुसाहेब लहारे, भिमराज निर्मळ, गोपीनाथ गोंदकर, दशरथ तुपे, राजेंद्र कोल्हे, अनुप कदम यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहाता बाजार समिती ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अग्रगण्य आहे. या बाजार समितीत शेतकरी हिताला महत्त्व दिले जात आहे. या बाजार समितीचा नावलौकिक चांगला आहे. यापुढेही आपण व आपले संचालक मंडळ बाजार समितीचा कारभार चांगलाच करतील. विखे पाटील यांनी आम्हाला सगळ्यांना बाजार समितीवर संधी दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

- ज्ञानेश्वर गोंदकर, सभापती

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com