
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी सोयाबीनला (Soybeans) 4790 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
सोयाबीनला (Soybeans) प्रतिक्विंटल किमान 4750 रुपये, जास्तीत जास्त 4790 रुपये तर सरासरी 4770 रुपये भाव मिळाला. गव्हाला (Wheat) किमान 2170 रुपये, जास्तीत जास्त 2370 रुपये तर सरासरी 2270 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सरासरी 4621 रुपये भाव मिळाला. मकाला (Corn) किमान 1751 रुपये, जास्तीत जास्त 1801 रुपये, तर सरासरी 1775 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 253 कॅरेटची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 101 ते 140 रुपये किलो. डाळींब नंबर 2 ला 66 ते 100 रुपये, डाळींब नंबर 3 ला 35 ते 65 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 34 रुपये भाव मिळाला.