
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 4770 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) किमान 4500 रुपये, जास्तीत जास्त 4770 रुपये तर सरासरी 4700 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2285 रुपये, जास्तीत जास्त 2320 रुपये तर सरासरी 2300 रुपये भाव मिळाला. मका (Corn) सरासरी 2012 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. बाजरी सरासरी 2151 रुपये भाव मिळाला.
डाळींबाच्या (Pomegranate) 8527 कॅरेटची आवक झाली. प्रतवारी नुसार डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 121 ते 160 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 71 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 36 ते 70 रुपये भाव मिळाला. तर डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.