
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला (Soybeans) 4981 रुपये भाव मिळाला तर डाळींबाला (Pomegranate) प्रतिकिलोला 130 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
बुधवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनची (Soybeans) 7 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला किमान 4950 रुपये भाव मिळाला. जास्तीत जास्त 4981 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 4965 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) किमान 4452 रुपये, जास्तीत 4531 रुपये तर सरासरी 4500 रुपये भाव मिळाला. तुरीला सरासरी 6890 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 1900 रुपये, जास्तीत जास्त 2176 रुपये, तर सरासरी 2050 रुपये भाव मिळाला. मकाला (Corn) सरासरी 2154 रुपये भाव मिळाला.
डाळींबाच्या (Pomegranate) 122 क्रेटस ची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 61 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला. तर डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 30 रुपये प्रतिकिलोला मिळाला. चिकुच्या 88 क्रेटसची आवक झाली. चिकुला किमान 1000 रुपये, जास्तीत जास्त 3000 रुपये तर सरासरी 2000 रुपये भाव मिळाला.