राहाता बाजार समितीत सोयाबीन 5625

राहाता बाजार समितीत सोयाबीन 5625

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत शनिवारी सोयाबीन प्रतिक्विंटलला 5625 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 5000 रुपये, जास्तीत जास्त 5625 रुपये तर सरासरी 5500 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 3601 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2951 रुपये मिळाला. मकाला कमीत कमी 1836 रुपये, जास्तीत जास्त 1990 रुपये तर सरासरी 1900 रुपये असा भाव मिळाला.

भाजीपाल्याची ही चांगली आवक झाली. प्रतिक्विंटल प्रमाणे भाव- बटाटा 2100-2300 रुपये, सरासरी 2200 रुपये. भेंडी 2500-3500 रुपये, सरासरी 3000 रुपये. लिंबू 1500-2500 रुपये, सरासरी 2000 रुपये. वाटाणा 3500-6000 रुपये, सरासरी 4700 रुपये. आले 2500-4000 रुपये, सरासरी 3300 रुपये, फ्लॉवर 500-1500 रुपये, सरासरी 1000 रुपये, ढोबळी मिरची 1000-3000 रुपये, सरासरी 2000 रुपये, दोडका (शिराळी) 1500-2000 रुपये, सरासरी 1700 रुपये.

गाजर 2000-3300 रुपये, सरासरी 2500 रुपये, वांगी 1000-1500 रुपये, सरासरी 1700 रुपये. मिरची हिरवी 2000-2500 रुपये, सरासरी 2200 रुपये, वालवड सरासरी 2500 रुपये, टोमॅटो 200-1500 रुपये, सरासरी 850 रुपये. घेवडा सरसरी 2000 रुपये. काकडी 500-1000 रुपये, सरासरी 800 रुपये. कारली 1000-2000 रुपये, सरासरी 1500 रुपये, कोबी 800-1000 रुपये, सरासरी 900 रुपये असा भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com