राहाता बाजार समितीत सोयाबीन 5495 रुपये

राहाता बाजार समितीत सोयाबीन 5495 रुपये

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत सोयाबीनला गुरुवारी जास्तीत जास्त 5495 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत 105 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. कमीत कमी 4790 रुपये, जास्तीत जास्त 5495 रुपये सरासरी 5375 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 3821 रुपये. गहू सरासरी 2900 रुपये. मका कमीत कमी 1865 रुपये, जास्तीत जास्त 1941 रुपये, 1900 रुपये. बाजरी सरासरी 1900 रुपये. सीताफळाच्या कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 6500 रुपये, तर सरासरी 4000 रुपये. पेरू सरासरी 3000 रुपये क्विंटल.

भाजीपाल्याचीही चांगली आवक झाली. प्रतिक्विंटल प्रमाणे भाव - बटाटा कमीत कमी 2000 रुपये, जास्तीत जास्त 2100 रुपये, सरासरी 2050 रुपये. भेंडी कमीत कमी 3500 रुपये, जास्तीत जास्त 4300 रुपये, सरासरी 3900 रुपये. लिंबू कमीत कमी 1500 रुपये, जास्तीत जास्त 2000 रुपये, सरासरी 1700 रुपये. दुधी भोपळा कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 1000 रुपये, सरासरी 700 रुपये. फ्लॉवर कमीत कमी 300 रुपये, जास्तीत जास्त 1000 रुपये, सरासरी 600 रुपये. ढोबळी मिरची कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 2200 रुपये, सरासरी 1600 रुपये. दोडका (शिराळी) कमीत कमी 2000 रुपये, जास्तीत जास्त 2500 रुपये, सरासरी 2200 रुपये.

गाजर कमीत कमी 1500 रुपये, जास्तीत जास्त 2500 रुपये, सरासरी 2000 रुपये. वांगी कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 1800 रुपये, सरासरी 1400 रुपये. मिरची हिरवी कमीत कमी 2500 रुपये, जास्तीत जास्त 3000 रुपये, सरासरी 2700 रुपये. टोमॅटो कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 1000 रुपये, तर सरासरी 700 रुपये, घेवडा सरासरी 2000 रुपये, काकडी कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 1000 रुपये, सरासरी 700 रुपये, कारली कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 2000 रुपये, सरासरी 1500 रुपये, कोबी कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 1000 रुपये, सरासरी 700 रुपये, असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com