
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत बुधवारी सोयाबीनला प्रतिक्विंटलला 5425 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 5250 रुपये, जास्तीत जास्त 5425 रुपये तर सरासरी 5350 रुपये भाव मिळाला.
गहू 2551 ते 2991 रुपये तर सरासरी 2775 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. मकाला 1850 ते 1980 रुपये, तर सरासरी 1900 रुपये. ज्वारीला जास्त सरासरी 2910 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 40 कॅरेटची आवक झाली.
प्रतिक्विंटल 1500 ते 7500 रुपये तर सरासरी 2000 रुपये भाव मिळाला. सिताफळाच्या 62 क्रेटसची आवक झाली. 1000 ते 5750 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 2000 रुपये भाव मिळाला.