राहाता बाजार समितीत सोयाबीन 6 हजारांच्या पुढे

राहाता बाजार समितीत सोयाबीन 6 हजारांच्या पुढे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल गुरुवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याची आवक झाली. कांद्याच्या 4219 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 2500 तर लाल कांद्यालाही 2600 रुपये इतका भाव मिळाला. तर सोयाबिनला जास्तीत जास्त 6151 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत 4 हजार 219 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2200 ते 2500 रुपये तर लाल कांद्याला 2300 ते 2600 असा भाव मिळाला. कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1550 ते 2150 रुपये, लाल कांद्याला 1650 ते 2250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 700 ते 1500 रुपये तर लाल कांद्याला 800 ते 1600 भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला 1700 ते 1900 रुपये व लाल कांद्याला 1800 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 600 रुपये व लाल कांद्याला 200 ते 700 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या 995 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 91 ते 115 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला.

सोयाबिनची 22 क्विंटल आवक झाली. सोयाबिनला कमीत कमी 6000 ते जास्तीत जास्त 6151 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 6075 असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला 1571 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. तर सिताफळाच्या 122 क्रेटसची आवक झाली. सिताफळास कमीत एका क्विंटलला 1500 तर जास्तीत जास्त 4500 रुपये व सरासरी 3000 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com