
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत काल बुधवारी सोयाबीनला जास्तीत जास्त 6160 रुपये इतका मिळाला. राहाता बाजार समितीत काल सोयाबीनला कमीत कमी 6000 रुपये, जास्तीत जास्त 6160 रुपये तर कमीत कमी 6100 रुपये भाव मिळाला. गव्हाला कमीत कमी 2122 रुपये, जास्तीत जास्त 2226 रुपये तर सरासरी 2180 रुपये भाव मिळाला.
हरभरा कमीत कमी 3696 रुपये, जास्तीत जास्त 4321 रुपये तर सरसरी 4521 रुपये प्रतीक्विंटल असा भाव मिळाला. डाळिंबाच्या 1116 क्रेट्सची आवक झाली. डाळिंबाला नंबर 1 ला प्रति किलोला कमीत कमी 111 रुपये तर जास्तीत जास्त 150 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.