राहाता बाजार समितीत सोयाबीनला 5501 रुपये भाव

राहाता बाजार समितीत सोयाबीनला 5501 रुपये भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल शनिवारी सोयाबीन ला जास्तीत जास्त 5501 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला.

बाजार समितीत 41 क्विंटल सोयाबीन ची आवक झाली. कमीत कमी 4705 रुपये तर जास्तीत जास्त 5501 रुपये प्रति क्विंटलला तर सरासरी 5300 रुपये भाव मिळाला. मका ची 25 क्विंटल इतकी आवक झाली. मका ला 1425 रुपये भाव मिळाला. मुगाला 4001 रुपये प्रतीक्विंटल भाव मिळाला.

हरबरा डंकी ला 3946 रुपये इतका भाव मिळाला. बाजरी ला 1736 तर गव्हाला 1840 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com