
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत सोयाबीनला 5111 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.गुरुवारी सोयाबीनची 49 क्विंटल आवक झाली. सोयाबीन ला कमीत कमी 4612 रुपये, जास्तीत जास्त 5111 रुपये, तर सरासरी 5000 रुपये भाव मिळाला.
हरभरा किमान 4556 रुपये, जास्तीत जास्त 4565 रुपये, तर सरासरी 4295 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची 96 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला किमान 166 ते 200 रुपये, डाळिंब नंबर 2 ला किमान 101 ते 165 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 61 ते 100 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 60 रुपये असा प्रतिकिलोला भाव मिळाला. चिकूला प्रतिक्विंटलला 2000 रुपये भाव मिळाला.