राहाता बाजार समितीकडून प्रवरा कोविड सेंटरला दहा लाख

राहाता बाजार समितीकडून प्रवरा कोविड सेंटरला दहा लाख

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने शासन निर्देशाप्रमाणे आपल्या उत्पन्नातून 10 लाख रुपयांची मदत प्रवरा कोविड सेंटरला केली आहे. या रक्कमेचा धनादेश बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. विविध दानशुर व्यक्ती आणि संस्थानी एकूण 14 लाख रुपयांची मदत उपलब्ध करुन दिली आहे.

राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीने 10 लाख रुपयांची मदत प्रवरा कोविड सेंटरसाठी उपलब्ध करुन दिली आहे. बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, उपसभापती बाळासाहेब जपे, संचालक बापुसाहेब आहेर, वाल्मीकराव गोर्डे, शरद मते, गोरक्ष गोरे, चंद्रभान बावके, यशवंत चौधरी, सचिव उध्दवराव देवकर आदिंनी हा धनादेश आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याच्या संचालकांनी स्वनिधीतून 55 हजार 555 रुपयांच्या मदतीचा धनादेश प्रवरा कोविड सेंटरसाठी सुपूर्द केला. याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडु, संचालक रामभाऊ भुसाळ, संजय आहेर, कैलास तांबे, अशोक घोलप, देविचंद तांबे, सतिष ससाणे, साहेबराव म्हस्के, अ‍ॅड. भानुदास तांबे, डॉ. दिनकर गायकवाड, स्वप्निल निबे आदि उपस्थित होते.

गणेशच्या संचालक मंडळानेही स्वनिधीतून 50 हजार, गणेश विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने 25 हजार आणि गणेश विद्या प्रसारक मंडळाच्या सेवक पतपेढीच्यावतीने 25 हजार रुपयांची मदत कोविड सेंटरसाठी देण्यात आली. याप्रसंगी गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, जालिंदर निर्मळ, विजय गोर्डे, जी. आर. चोळके, नितीन गाढवे, मधुकर कोते, सुदामराव सरोदे, राजेंद्र थोरात, अभिजीत भागडे आदी उपस्थित होते.

या सहकारी संस्थाबरोबरच कोल्हार येथील मार्केट कमिटीमधील व्यापार्‍यांनी 45 हजार रुपये, कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्यावतीने 61 हजार, प्रा. प्रकाश रावसाहेब विखे परिवाराच्यावतीने 51 हजार, सयाजी रघुनाथ खर्डे 21 हजार, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडु 11 हजार, गणेश कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रतापराव जगताप 21 हजार, सहकारी संस्थांचे सहाय्यक उपनिबंधक जितेंद्र शेळके 11 हजार, किसनराव विखे परिवाराच्या वतीने 20 हजार, डॉ. प्रशांत गोंदकर आणि डॉ. स्वाधीन गाडेकर 21 हजार, डॉ. श्रीकांत बेंद्रे व प्रमोद बेंद्रे 21 हजार, स्व. भास्कर आप्पा दिघे यांच्या स्मरणार्थ राहुल दिघे यांनी 21 हजार, डॉ. संजय कहार 11 हजार, रविराज व प्रशांत संजय आहेर 5 हजार, आप्पासाहेब चोळके 2100 रुपयांच्या मदतीचा धनादेश आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

डॉ. विखे पाटील कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, डॉ. राहुल खर्डे यांनी ऑक्सीजन कॉन्सट्रेटरचे दोन सेट तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दाढ येथील महात्मा फुले विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी 150 वेपोरायझर स्टिमर दिले आहेत. कोल्हार येथील खा. डॉ.सुजय विखे पाटील युनायटेड फ्रंट यांच्यातर्फे दोन हजार अंडी, रवींद्र दिघे व विजय नालकर यांनी 20 बॉक्स बिसलेरी बॉटल आणि छत्रपती शासन लोणी खुर्द यांच्यावतीने 70 बिस्कीटांचे बॉक्स दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com