
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला तर सोयाबीनला 5031 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
कांद्याच्या 11814 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 700 ते 1100 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 450 ते 650 रुपये, कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 450 ते 550 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला प्रतिक्विंटलला किमान 5023 रुपये, जास्तीत जास्त 5031 रुपये तर सरासरी 5025 रुपये भाव मिळाला.
गव्हाला सरासरी 2162 रुपये भाव मिळाला. हरभरा किमान 4451 रुपये, जास्तीत जास्त 4676 रुपये तर सरासरी 4600 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 1801 रुपये भाव मिळाला. चिकुला किमान 250 रुपये, जास्तीत जास्त 1500 रुपये तर सरासरी 1000 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या 368 कॅरेटची आवक झाली.
डाळींब नंबर 1 ला 101 ते 145 रुपये किलो. डाळींब नंबर 2 ला 66 ते 100 रुपये, डाळींब नंबर 3 ला 41 ते 65 रुपये. डाळींब नंबर 4 ला 20 ते 40 रुपये. चिकुला सरासरी 1250 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.