
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी लुज कांद्याला (Onion) 1050 रुपये भाव मिळाला. लुज कांद्याची (Onion) राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) चांगली आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 751 ते 1051 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 476 ते 750 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 225 ते 475 रुपये भाव मिळाला.
सोयाबीनला (Soybeans) किमान 4301 रुपये, जास्तीत जास्त 4836 रुपये तर सरासरी 4750 रुपये भाव मिळाला. गव्हाला (Wheat) किमान 2300 रुपये, जास्तीत जास्त 2412 रुपये, तर सरासरी 2350 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 682 कॅरेटची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 151 ते 255 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 150 रुपये, डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये, डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये असा भाव मिळाला.