राहाता बाजार समितीत कांदा व सोयाबीनला मिळतोय हा भाव

कांदा व सोयाबीन
कांदा व सोयाबीन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी लूज कांद्याला (Onion) 1200 रुपये तर सोयाबीनला (Soybeans) 5600 रुपये भाव मिळाला. लूज कांदा (Onion) नंबर 1 ला कमीत कमी 1001 तर जास्तीत जास्तीत 1200 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 701 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 700 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला (Soybeans) कमीत कमी 5000 रुपये, जास्तीत जास्त 5600 रुपये तर सरासरी 5500 रुपये भाव मिळाला. हरबरा (Gram) कमीत कमी 3600 रुपये, जास्तीत जास्त 4235 रुपये तर सरासरी 3900 रुपये भाव मिळाला. मकाला (Corn) कमीत कमी 1800 रुपये, जास्तीत जास्त 2019 रुपये तर सरासरी 1900 रुपये भाव मिळाला. गव्हाला (Wheat) कमीत कमी 2651 रुपये, जास्तीत जास्त 3059 रुपये, तर सरासरी 2850 रुपये भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) प्रतिक्विंटलला कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 8000 रुपये, तर सरासरी 5000 रुपये भाव मिळाला. सिताफळाला (Sitaphal) कमीत कमी 500 ते 5000 रुपये, सरासरी 3000 रुपये भाव मिळाला. पेरुच्या 25 के्रटसची आवक झाली. पेरुला सरासरी 500 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com